Pune News: स्वारगेट बस स्थानकावर 26 वर्षीय तरुणीवर घडलेल्या अत्याचार घटनेत आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेचे वकील वाजीद खान बिडकर यांचे जुनिअर साहिल डोंगरे याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला असल्याचा आरोप वाजीद खान बिडकर यांनी केला आहे.
आज्ञात लोकांनी त्यांना गाडीत उचलून नेले आणि मारहाण करून दिवेघाटात सोडून दिले असा आरोप वाजीद खान बिडकर यांच्याकडून करण्यात आला.
तर दुसरीकडे पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, साहिल बबन डोंगरे वय- 25, धंदा- वकिली व समाजकार्य (वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी) यांना पहाटेच्या सुमारास काही इसमानी गाडीतळ परिसरातून जबरदस्तीने गाडीत बसवून मारहाण करून दिवे घाट येथे सोडून दिले.
त्यांना डोळ्याजवळ, पायाला व शरीरावर किरकोळ जखमा दिसत असून त्यांना नेमके कुठून व कधी गाडीत बसवून नेले याबाबत व्यवस्थित माहिती सांगता येत नाही
अधिक माहिती घेतली असता ते रात्री दारू पिऊन होते व मोटर सायकलवर स्लीप होऊन पडले असल्याची शक्यता वाटते.
हडपसर पोलीस स्टेशन येथे ते हजर होताच , त्यांना उपचारासाठी पोलीस अंमलदार देऊन ससून रुग्णालय येथे पाठविले आहे.