Mon. Jun 23rd, 2025

KKR vs SRH: आयपीएल 2025 मध्ये गुरुवारी कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादवर 80 धावांनी शानदार विजय मिळवला. कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात केकेआरने प्रथम फलंदाजी करताना 6 विकेट्स गमावून 200 धावा केल्या.

वेंकटेश अय्यर, अंगकृष रघुवंशी आणि रिंकू सिंग यांच्या उत्कृष्ट खेळीमुळे कोलकाताने चांगली धावसंख्या उभारली.

29 चेंडूत 60 धावा

अय्यरने 29 चेंडूत सात चौकार आणि तीन षटकारांसह 60 धावा केल्या तर रिंकू सिंगने 17 चेंडूत 32 धावा केल्या, तर अंगकृष रघुवंशीने 32 चेंडूत 50 धावा केल्या. शेवटच्या पाच षटकांत कोलकाताने 78 धावा जोडल्या.

हैदराबादचा हा सलग तिसरा पराभव होता. यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्सने त्यांना पराभूत केले होते. हैदराबादला विजयासाठी 201 धावांची आवश्यकता होती, पण कोलकाताच्या गोलंदाजी समोर त्यांचा फलंदाजीचा क्रम कोसळला त्यामुळे संपूर्ण संघ 120 धावांवर ऑल आऊट झाला.

ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा अपयशी ठरलेहैदराबादचे ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा हे दोघेही लवकर बाद झाले. पहिल्या षटकात हेडने चौकार मारला पण पुढच्या षटकात हर्षित राणाने त्याला झेलबाद केले.

दुसऱ्याच षटकात राणाने अभिषेकलाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर, इशान किशन आणि नितीश कुमार रेड्डी देखील लवकर बाद झाले. हेनरिक क्लासेनने 21 चेंडूत 33 धावा केल्या, पण तोही लवकर बाद झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *