Sat. Jun 21st, 2025

Solapur News : सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोफिजिशीयन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी महिलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

डॉ. वळसंगकर यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्या प्रकरणी आरोपी मनीषा माने या महिले विरोधात गुन्हा दाखल

करण्यात आला होता. या प्रकरणी सुनावणी करताना सोलापूर सत्र आणि दिवाणी न्यायाधीश तथा न्याय दंडाधिकारी दीपक कंखरे यांनी आरोपी महिलेला पोलीस कोठडी सुनावली आहे.

माहितीनुसार, आरोपी मनीषा माने ही डॉ. वळसंगकर यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत होती मात्र तिला कामावरून काढल्याने डॉ. वळसंगकर यांना स्वतः आत्महत्या करण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली.

सदर बझारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी ३ दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. दोन्ही बाजूचा युक्तिवाद लक्षात घेऊन, न्यायाधिशांनी पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान आरोपी मनीषा माने हिच्यासोबत या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा तपास आता पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *