Sat. Jun 21st, 2025

Virat Kohli: काही दिवसांपूर्वी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तर आता आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली देखील कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार करत आहे.

माहितीनुसार, विराट कोहली इंग्लंड दौऱ्यापूर्वी कसोटीमधून निवृत्ती जाहीर करणार आहे. त्याने याबाबत बीसीसीआयला देखील माहिती दिली आहे. भारताचा इंग्लड दौरा 20 जूनपासून सुरू होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.

कोहलीने काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयला त्याच्या निर्णयाची माहिती दिली आहे आणि आता इंग्लंड दौऱ्यात खेळण्याची त्याची शक्यता खूप कमी आहे.

कोहलीच्या या निर्णयावरून बीसीसीआयमध्ये बराच गोंधळ सुरू आहे. बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या विषयावर विराट कोहलीशी बोलले आहे आणि त्याला त्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. मात्र कोहलीने आपले हेतू स्पष्ट केले आहेत आणि इंग्लंड दौऱ्यापासून स्वतःला दूर ठेवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून अचानक निवृत्ती घेतल्यानंतर, विराट कोहलीनेही या फॉरमॅटमधून निवृत्तीची बातमी भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी धक्कादायक आहे. यापूर्वी, दोन्ही दिग्गज फलंदाजांनी टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, जी भारताच्या विश्वचषक विजयानंतर झाली.

जर कोहलीनेही कसोटीतून निवृत्ती घेतली तर भारतीय कसोटी संघाला फलंदाजीच्या क्रमात अनुभवाची मोठी कमतरता भासेल. त्यामुळे यशस्वी जयस्वाल, केएल राहुल आणि शुभमन गिल सारख्या तरुण खेळाडूंवर मोठी जबाबदारी येईल.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कोहली अपयशी ठरला

2024-25 च्या कसोटी मालिकेत कोहलीची कामगिरी निराशाजनक होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेत त्याने फक्त 190 धावा केल्या. पर्थ कसोटीत शानदार शतक केल्यानंतर, उर्वरित चार सामन्यांमध्ये तो फक्त 85 धावा करू शकला. हा दौरा त्याच्यासाठी खूप आव्हानात्मक होता.

कोहलीची कसोटी कारकीर्द

विराट कोहलीने आतापर्यंत 123 कसोटी सामने खेळले आहेत आणि एकूण 9,230 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याच्या नावावर 30 शतके आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *