Mon. Jun 23rd, 2025

Fake Money: पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. नीलेश वीरकर, सैफान पटेल, अफजल शहा, शाहीद जक्की कुरेशी, शाहफहड अन्सारी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

या प्रकरणात समोर आलेल्या माहितीनुसार, सहकारनगर पोलिस ठाण्यातील तपास पथक पद्मावती भागात गस्त घालत होते. पद्मावती बस स्थानकाजवळ पोलिसांना पाहून एकजण स्वारगेटच्या दिशेने पळू लागला. पोलिसांनी त्याला पाठलाग करून अडवले आणि त्याची झडती घेतली. यावेळी त्याच्या खिशातून पाचशे रुपयांच्या नोटांचे बंडल मिळाले. रात्री अंधारात तो बनावट नोटा वटविण्याच्या प्रयत्न करीत होता. त्याला शाहीद कुरेशी, सैफान पटेल, अफजल शहा यांनी या नोटा दिल्याचे सांगितले.

पोलिसांनी वीरकरला नवी मुंबई येथे नेत तिथून शाहीदला अटक केली. चौकशीत अन्सारीने त्याला बनावट नोटा दिल्याची माहिती दिली. सहकारनगर पोलिसांनी एक-एक साखळी जोडत पाच जणांना अटक केली

त्यांच्याकडून 10 लाख 35 हजार रुपयांच्या पाचशेच्या दोन हजार नोटा जप्त केल्या. या सर्व बनावट नोटा दिल्ली, उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथून आणल्याचे सांगितले. अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *