Maruti Suzuki Fronx Discount Offer : नवीन वर्षात तुम्ही मारुती सुझुकीची नवीन कार खरेदी करण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय बाजारात मारुती सुझुकीने मारुती फ्रॉन्क्सच्या विविध व्हेरियंटवर तब्बल 1.33 लाखांचा डिस्काउंट ऑफर जाहीर केला आहे. या ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही आता अगदी कमी किमतीमध्ये नवीन कार खरेदी करु शकतात. भन्नाट फीचर्स, उत्तम मायलेजसह भारतीय बाजारात या कारने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
2025 मध्ये उत्पादित फ्रॉन्क्स युनिट्सवर जानेवारी महिन्यात कंपनी मारुती फ्रॉन्क्सच्या टर्बो-पेट्रोल व्हेरियंटवर 83000 पर्यंतची सूट देत आहे. तर सीएनजी व्हेरियंटवर 10000 चा एक्सचेंज बोनस आणि 15000 चा स्क्रॅपेज बेनिफिट कंपनीकडून मिळणार आहे.
तर 2024 मध्ये उत्पादित फ्रॉन्क्स स्टॉकवर पेट्रोलवर 45000 रुपयांपर्यंत आणि टर्बो पेट्रोल (वेलोसिटी किटसह) व्हेरियंटवर 1.33 लाख रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे.
मारुती सुझुकी फ्रॉन्क्समध्ये 1.0 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि 1.2 लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. तसेच ही कार बाजारात सीएनजीमध्ये देखील उपलब्ध आहे. तुम्ही ही कार सिग्मा, डेल्टा, डेल्टा प्लस, झेटा आणि अल्फा या पाच व्हेरियंटमध्ये खरेदी करु शकतात.
कंपनीने या कारच्या केबिनमध्ये नऊ इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, क्रूझ कंट्रोल, वायरलेस फोन चार्जिंग सारखी फीचर्स दिली आहे. तर सहा एअरबॅग्ज, 360-डिग्री कॅमेरा सारखी सेफ्टी फीचर्स देखील या कारमध्ये देण्यात आली आहे. भारतीय बाजारात ही कार 7.51 लाख ते 13.04 लाखांपर्यंत जाते.