Gopichand Padalkar : नेहमी काहींना काही कारणाने राज्यातील राजकारणात चर्चेचा विषय असणारे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आज बारामती न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त आरोपातून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची निर्दोष मुक्तता केली आहे.
गोपीचंद पडळकर यांनी 2020 मध्ये कोरोनाच्या काळात शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला झालेला कोरोना आहे. असं वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वादग्रस्त विधानानंतर त्यांच्या विरोधात त्यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अमर धुमाळ यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात पुन्हा दाखल करण्यात आला होता.
यावेळी पडळकर यांना वारंवार समन्स बजावून देखील न्यायालयात हजर राहिले नव्हते. आज न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे.